सोलापूर : काँग्रेसच्या लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे सध्या त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी भाजपमुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा ज्येष्ठ संचालक धर्मराज कडादी आणि त्यांच्या काखान्याच्या शेतकरी सभासदांना त्रास सहन करावा लागला. मात्र आता काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे, त्यामुळे आता त्रास सहन करायची नाही, तर त्रास देण्याची वेळ आली, असे विधान केले आहे.
भाजपवर टीका
सिद्धेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना भाजपच्या लोकामुळे त्रास सहना करावा लागला आहे. हे सांगताना सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याचे प्रणिती शिंदे यांना आधोरेखित करायचे होते.आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. आता त्रास सहन करायची नाही, तर त्रास देण्याची वेळ आली आहे, त्यामुळे मागील 10 वर्षांत तुम्हाला जो त्रास झाला आहे, तो पुसून काढायचा आहे, असं सांगून खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.