मुंबई : आजपासून पदवीधर मतदारसंघाच्या मनमोजणीला सुरुवात झाली. अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपने बाजी मारली आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी विजय मिळवला आहे.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. कोकण पदवीधरमध्ये भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे.
कोकणातील पदवीधर व शिक्षक मतदारांनी माझ्यावर सलग तिसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी व कृतज्ञ आहे. आपल्या सर्व मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न करेल.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारत २०४७ घडविण्याबरोबरच कोकणातील शाळांमध्ये… pic.twitter.com/UDNUFYaJf6— Niranjan Davkhare (@niranjandtweets) July 1, 2024
हा विजय आपण महायुतीच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना समर्पित
महायुतीचे कोकणातील सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतल्यामुळेच महायुतीला यश मिळविता आले. हा विजय आपण महायुतीच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली आहे.