मुंबई : रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. यानंतर त्यांचे पुत्र आमदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटरवर वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तुम्हाला सगळी पदं सहज मिळाली नाहीत, तुम्ही केलेला संघर्ष पाहिला, तुमच्यातला खरा माणूस अनेकांना कळलाच नाही अशा भावना निलेश राणे यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार.
ही सगळी पदं सहज आली नाही, त्या साठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून… pic.twitter.com/d2w8qy8ohL
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) June 25, 2024
निलेश राणेंनी काय लिहिले पोस्टमध्ये?
1985 नगरसेवक, 1990 ते 2014 सलग सहा वेळा आमदार (1 पोटनिवडणूक), 2014 ते 2024 विधानपरिषद 1 वेळा, राज्यसभा 1 वेळा आणि 2024 आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही. पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोक इतके वर्षे जोडून ठेवणं सोपं नाही.
जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही की निलेश, नितेशला सांभाळा. कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खासकरून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे. निलेश राणेंनी या पोस्टच्या माध्यमातून नारायण राणे यांचा नगरसेवक, आमदार ते खासदारकीपर्यंतचा प्रवास मांडला आहे.