NEET Paper Leak Case । नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी महत्वाची बातमी सामोरे आलीय. या प्रकरणातील आरोपी संजय जाधव याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजय जाधव यांची सध्या चौकशी सुरू आहे. पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यात आतापर्यंत फक्त जलील खान पठाण एकमेव आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, लातूर पोलिसांना संजय जाधवला ताब्यात घेण्यात यास आले आहे.
एकाला सात दिवसांची पोलीस कोठडी NEET Paper Leak Case ।
देशात सध्या गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आलं. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक जलील पठाण आणि संजय जाधव इतर दोन अशा एकूण चार आरोपींची नावं समोर आली होती. जलील पठाणला रविवारी पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी कोर्टासमोर हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. संजय जाधव या जिल्हापरिषदेच्या शिक्षकाचा शोध सुरू होता. पोलिसांनी संजय जाधवला अटक केली आहे. शिक्षक संजय जाधव याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
चार आरोपी नेमके कोण? NEET Paper Leak Case ।
नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. लातूर येथील संजय जाधव, जरील खान, उमरखान पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरणणा कोनगलवार, असं या प्रकरणातील चौथ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलंय. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा
“पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार” ; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अजित पवार गटाचा इशारा