Nashik Teachers Constituency Election Result | राज्यातील नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणीला होत आहे. या मतमोजणीत दोन वेळेस जास्त मतपत्रिका आढळून आल्या आहेत. एकूण पाच बोगस मतपत्रिका जास्त आढळल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला. यासाठी खुद्द शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदानाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने पार पडत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघात जास्त मतपत्रिका आढळल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करून सर्व माहिती घेतली.
उद्धव ठाकरेंचा थेट नाशिकला फोन Nashik Teachers Constituency Election Result |
या सर्व घडामोडींवर खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करत नेमकी काय घटना घडली याची माहिती घेतली. जर मतपत्रिका सील केलेल्या असतील तर पाच मतपत्रिका जास्त आल्या कशा? आणि कुठल्या जिल्ह्यातल्या याबाबतची माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने यावर नेमका काय आक्षेप घेतला आणि त्याचे पुढे काय होणार याची देखील त्यांनी माहिती घेतली आहे.
मतपत्रिका जास्त आल्यानं आम्हाला संशय -सुधाकर बडगुजर Nashik Teachers Constituency Election Result |
दरम्यान, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत,”चोपडा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. मतपत्रिका जास्त कशा आल्यात? याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी. मटपेट्या सील करताना अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. त्यामुळे मतपत्रिका जास्त आल्यानं आम्हाला संशय आहे. ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत हे मतदान केंद्र येते, त्याच्यावर कारवाई करा. मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का? याचा तपास करण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हेही वाचा
आमदार जयकुमार गोरेंचा पाय खोलात? ; कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी निधी लाटला