वॉशिंग्टन : भारतीय अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आता अमेरिकेची अवकाश संस्था नासाद्वारे दिले जाणार आहे. नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन यांनी ही माहीती दिली. नासा आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोबरोबरच्या सहकार्याची व्याप्ती वाढवणार असून त्याअंतर्गत भारतीय अंतराळ वीराना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलियन आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत इनिशिएटटिव्ह ऑन क्रिटिकल इंजिनिअरींग टेक्नोलॉजी वार्तालाप झाल्यानंतर इस्रोच्या अंतराळवीरांना अमेरिकेत प्रशिक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आम्ही एकत्रितपणे आमच्या देशांचे अंतराळातील सहकार्य वाढवत आहोत, इस्रोच्या अंतराळवीरांना अवकाश स्थानकावर पाठवण्याच्या मोहीमेचा तपशील निश्तित केला जातो आहे.
हे प्रयत्न भविष्यातील मानवी अंतराळ उड्डाणांना समर्थन देतील आणि पृथ्वीवरील जीवन सुधारतील, असे नेल्सन म्हणाले. भारत आणि अमेरिकेने मोठ्या धोरणात्मक हिताचा भाग म्हणून गंभीर तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर राहिले पाहिजे, असा निष्कर्षही सुलियन आणि डोवाल यांच्यातील बैठकीमध्ये निघाला.