मुंबई : महायुतीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली. यानंतर ही योजना मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. या योजनेवरून विरोधकांनी सरकारवर टीकादेखील केली होती. मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु करण्यात आली आहे. आजपासून या योजेनच्या लाभार्थी नोंदणीला प्रारंभ झाला झाला आहे. 21 ते 60 वर्ष दरम्यानच्या लाभार्थी महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. चला तर मग या योजनेचा लाभ घेण्सासाठी काय निकष आहेत? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
काय आहे लाडकी बहीण योजना
ही योजना 21 ते 60 वर्षे वय असलेल्या महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. आजपासून या योजेनच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे.
कोणत्या महिला ठरणार पात्र?
लाभ घेणाऱ्या महिला या महाराष्ट्रातील रहिवाशी असाव्यात.
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
60 वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
कोणत्या महिला ठरणार अपात्र ?
2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
घरात कोणी Tax भरत असेल तर लाभ मिळणार नाही.
कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल त्यांनादेखील याचा लाभ घेता येणार नाही.
कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरेल.
कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून ) या योजनेचा लाभ घेता येणार नाही.