Maharashtra Premier League 2024 – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत सातव्या दिवशी पहिल्या लढतीत राहुल त्रिपाठी(नाबाद ६७धावा) याने केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा डकवर्थ लुईस पद्धतीने १० गडी राखून पराभव करत पहिला विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत तळाच्या स्थानी असलेल्या कोल्हापूर संघाने दुसऱ्या स्थानी असलेल्या छत्रपती संभाजी किंग्स संघाचा पराभव करून विजयाचे खाते उघडले.
राहुल त्रिपाठीच्या वादळी खेळीच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघावर दणदणीत विजय मिळवला.
@mplt20tournament #MPL #MPL2024 #MahaCricket #MCA #म #मराठी pic.twitter.com/DiQmHa4TMM
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) June 8, 2024
ओम भोसले व ओमकार खाटपे या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ३३चेंडूत ३८धावाची भागीदारी केली. त्यानंतर सौरभ सिंगने २१ धावा काढून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. छ्त्रपती संभाजी किंग्स संघ १७व्या षटकात ६गडी १२२धावा असताना पाऊस सुरु झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे विजयासाठी पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला ११ षटकात ९३धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. कोल्हापूर टस्कर्स संघाकडून निहाल तुसामत(२-१७), योगेश डोंगरे(१-३), श्रीकांत मुंढे(१-१४), यश खळदकर (१-२७) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
They finished the game in 𝙨𝙩𝙮𝙡𝙚 👏
Congratulations @kohlapurtuskers on your 🔝 magnificent win 🤩@MahaCricket@JioCinema@Sports18#MaharashtraPremierLeague2024 #ThisIsMahaCricket #MaharashtraCricket #T20Cricket #KolhapurTuskers #ChhatrapatiSambhajiKings pic.twitter.com/qPf2sD3It9
— MPLT20Tournament (@mpltournament) June 8, 2024
९३ धावांचे आव्हान पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने ७.२ षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले. यात कर्णधार राहुल त्रिपाठीने २९चेंडूत नाबाद ६७धावांची खेळी केली. त्यात त्याने ११चौकार व २ षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले.
MPL 2024 : रायगड रॉयल्स संघाचा दुसरा विजय, कोल्हापूर टस्कर्सवर 13 धावांनी केली मात…
निकाल (साखळी फेरी) : छत्रपती संभाजी किंग्स: १७ षटकांत ६ बाद १२२(ओमकार खाटपे ३९, ओम भोसले २१; निहाल तुसामत २-१७, योगेश डोंगरे १-३, श्रीकांत मुंढे १-१४) पराभुत वि.पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स: ७.२ षटकांत बिनबाद ९४ (राहुल त्रिपाठी नाबाद ६७, अंकित बावणे नाबाद २६; सामनावीर – राहुल त्रिपाठी.