ब्रुसेल्स : नाटोचे सरचिटणीस होण्यासाठीच्या शर्यतीतून रोमानियाचे अध्यक्ष क्लॉस लोहानिस यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता नाटोचे प्रमुख होण्यासाठी नेदरलॅन्डचे पंतप्रधान मार्क रुट हे एकमेव प्रबळ दावेदार शिल्लक राहिले आहेत. रोमानियाच्या सुरक्षा परिषदेने रुट यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे लोहानिस यांंच्या कार्यालयाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
लोहानिस यांनी माघार घेतल्यामुळे रुट यांच्या वाटेतील अखेरचा अडथळा देखील आता दूर झाला आहे. आता रुट यांची एकमताने निवड करण्यात यावी आणि युक्रेनच्या मुद्यावरून नाटोने ऐक्य दाखवावे, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. नाटोच्या वर्धापन दिनानिमित्त नाटोचे मुख्यलय असलेल्या ब्रुसेल्समध्ये अमेरिका आणि अन्य प्रशांत क्षेत्रातील देशांच्या प्रमुख नेत्यांची बैठक ९ ते ११ जुलै रोजी होणार आहे.
त्यावेळी नाटोच्या सरचिटणीसपदाच्या नवीन उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. नाटोचे सरचिटणीस हे सर्व ३२ सदस्य देशांमधील बैठकांच्या अध्यक्षतेसाठी आणि काहीवेळा नाजूक सल्लामसलत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जबाबदार असतात. नाटोच्या सदस्यांशी केलेल्या या सल्लामसलतीतूनच नाटो एकमताने कार्य करणे सुरू ठेवू शकेल.