Manipur Violence । ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातील संगणकशास्त्राचे प्राध्यापक आणि भारतीय वंशाचे उदय रेड्डी यांच्यावर जातीय हिंसा भडकावल्याचा आरोप आहे. प्रोफेसरवर लोकांना भडकवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन मेसेज पोस्ट करण्याचा आणि चॅट सेशन आयोजित केल्याचा आरोप आहे.
मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपींचे कॅनडातील खलिस्तानी घटकांशीही संबंध असू शकतात, असा दावाही या तक्रारीत करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, त्यांच्या ऑनलाइन चॅट सेशनद्वारे, बर्मिंगहॅम विद्यापीठातील संगणक विज्ञानाचे प्राध्यापक उदय रेड्डी धार्मिक कारणावरून समुदायांमध्ये तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मैतेईच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान Manipur Violence ।
प्रोफेसर उदय रेड्डी यांनी जाणूनबुजून मैतेईजच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी मैतेई आणि इतर समुदायांमधील शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर आरोप Manipur Violence ।
फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, प्रोफेसर उदय रेड्डी हे सोशल मीडियावर चर्चा करताना मणिपूरच्या लोकांना राज्यातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात त्रास कसा निर्माण करायचा याबाबत सूचना देत होते. एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की आरोपीचे कॅनडातील खलिस्तानी आणि नार्को-दहशतवादी गटांशी संबंध असू शकतात. अशा परिस्थितीत आरोपींचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत. याशिवाय UAPA अंतर्गतही गुन्हा दाखल करावा.
तक्रारदाराने भारतीय अधिकाऱ्यांना रेड्डी यांच्या कामाच्या ठिकाणी संपर्क साधावा आणि त्यांनी भारताविरुद्ध केलेल्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती द्यावी अशी विनंती केली आहे. रेड्डी यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर (LOC) जारी करण्याची मागणीही तक्रारदाराने केली आहे.
हेही वाचा
मणिपूर हिंसाचारात खलिस्तानी कनेक्शन ; यूकेच्या प्राध्यापकाविरोधात FIR दाखल