Maharashtra Lok Sabha Result 2024 Live । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या गेलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याविषयीचा फैसला होईल. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने (एनडीए) सत्ता कायम राखल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हॅट्ट्रिक होईल. त्यामुळे सलग तिसऱ्या निवडणुकीत विजय मिळवण्याच्या देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी मोदी बरोबरी करू शकतील. ती किमया मोदी साधणार की विरोधकांची इंडिया आघाडी चमत्कार घडवणार याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : सिंधुदुर्गात नारायण राणेंचा विजय निश्चित
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : सुनील तटकरे अकराव्या फेरीनंतर आघाडीवर, 38 हजार 700 मतांनी पुढे
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे ९६ हजारांनी आघाडीवर
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : सिंधुदुर्गात नारायण राणे १७०० मतांनी आघाडीवर
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल तटकरे 5400 मतांनी आघाडीवर
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे सिंधुदुर्गमधून पिछाडीवर
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत. सध्या 2093 मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : रायगडमधून सुनील तटकरे आघाडीवर
रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली आहे.
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : सिंधुदुर्गमधून नारायण राणेंनी घेतली आघाडी
केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे सिंधुदुर्गमधून सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहेत
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : नारायण राणेंनी घेतलं गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपतीचं दर्शन
रत्नागिरी: केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी सपत्नीक राणे बापाच्या चरणी नतमस्तक झाले.
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live : केंद्रातील सत्ता ठरवण्यात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.
Maharashtra Lok Sabha Result 2024 Live :
- ठाणे मतदारसंघात एकूण 52.09% मतदान झालं.
- ठाणे मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 49.81% मतदान झालं आहे.
- ठाणे मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 45.38% मतदान झालं आहे.
- ठाणे मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 36.07% मतदान झालं आहे.
- ठाणे मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 26.05% मतदान झालं आहे.
- ठाणे मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 14.86 % मतदान झालं आहे.
- ठाणे मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.67% मतदान पार पडले.
- महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं.
- लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं.
- ठाणे मतदारसंघातील उमेदवार
शिवसेना (शिंदे गट)- नरेश म्हस्के
शिवसेना (ठाकरे गट)- राजन विचारे
वंचित – रामराव केंद्रे
कोकण
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
रायगड