LPG Price Reduced । एलपीजी सिलिंडरच्या दरात आज बदल करण्यात आला असून त्याच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात 30 ते 31 रुपयांनी कपात करण्यात आलीय. ती आज 1 जुलैपासून लागू झाली आहे. एलपीजी दरातील ही कपात किरकोळ आहे. ती 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी आहे. या कपातीमुळे व्यावसायिक एलपीजी वापरकर्ते जसे रेस्टॉरंट मालक आणि ढाबा मालकांना स्वस्त सिलिंडर मिळणार आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
जाणून घ्या तुमच्या शहरात एलपीजी सिलिंडर किती स्वस्त ? LPG Price Reduced ।
* राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1646 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1676 रुपये प्रति सिलेंडर होती.
* कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1756 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर १७८७ रुपये होती.
* मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1598 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर १६२९ रुपये होती.
* चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1809.50 रुपये झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1840.50 रुपये प्रति सिलेंडर होती.
इतर राज्यांमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमती LPG Price Reduced ।
बिहारची राजधानी पाटणामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1915.5 रुपयांवर आली आहे. त्याचवेळी गुजरातमधील अहमदाबादमध्ये 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1665 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही
घरगुती 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि ते त्यांच्या पूर्वीच्या किमतींवर स्थिर आहेत.दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना उपलब्ध आहे. कोलकाता येथे घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना उपलब्ध आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडर 802.50 रुपयांना उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडर 818.50 रुपयांना उपलब्ध आहे.
हेही वाचा
तीन नवे फौजदारी कायदे आजपासून लागू ; नवीन कायद्यात काय-काय बदल ?