Lok Sabha Speaker । भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ओम बिर्ला मंगळवारी या संदर्भात नामांकन दाखल करणार आहेत.
लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लोकसभा अध्यक्षांच्या नावावर एकमत निर्माण करण्याच्या सत्ताधारी एनडीएच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांशी संपर्क साधला. त्याचवेळी लोकसभेच्या उपसभापती पदाबाबतही चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. मात्र यावेळी त्यांनी पाठिंब्याबाबत अट ठेवली असल्याची माहिती समोर आलीय.
काय म्हणाले राहुल गांधी? Lok Sabha Speaker ।
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी केंद्र सरकारने उपसभापतीपद विरोधकांना दिल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असे राहुल गांधी म्हणाले. लोकसभेच्या उपसभापतीपदाच्या विरोधकांच्या मागणीला राजनाथ सिंह यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
#WATCH | Delhi: Congress MP Rahul Gandhi says “Today it is written in the newspaper that PM Modi has said that the Opposition should cooperate with the Govt constructively. Rajnath Singh called Mallikarjun Kharge and he asked him to extend support to the Speaker. The entire… pic.twitter.com/yR5CzlagEx
— ANI (@ANI) June 25, 2024
याविषयी राहुल गांधी म्हणाले, “मी वर्तमानपत्रात वाचले की, पंतप्रधान मोदींनी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे, असे म्हटले आहे. राजनाथ सिंह यांनी आघाडीतून फोन करून सभापतीपदाला पाठिंबा असल्याचे सांगितले, पण उपसभापतीपद आम्हाला मिळाले पाहिजे, अशी आमची अट आहे. यावर राजनाथ सिंह यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.
उपसभापतिपद आम्हाला मिळावे -अखिलेश यादव Lok Sabha Speaker ।
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सभापती आणि उपसभापती पदावर मोठा दावा केला आहे. उपसभापतिपद मिळावे, ही आमची मागणी एकच होती, मात्र अद्याप त्याबाबत स्पष्टता नाही, असे ते म्हणाले. काही वेळातच परिस्थिती स्पष्ट होईल. दुसरीकडे, सभापतींच्या नावाबाबत अद्यापही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले की, जोपर्यंत सभापती कोण होणार हे सांगितल्या जात नाही आणि त्यांच्याशी चर्चा केली जात नाही तोपर्यंत आम्ही काहीही बोलू शकत नाही. 12 वाजेपर्यंत परिस्थिती स्पष्ट झाल्यावर विरोधक आपली भूमिका स्पष्ट करतील.