Lok Sabha Result 2024 (Dindori) : लोकसभा निवडणुकीचे सर्व निकाल हळूहळू आता जाहीर होत आहेत. अनेक मोठ्या लढतींचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातीलही बऱ्याच ठिकाणचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये मोठे दिग्गज पराभूत झाले आहेत. पराभूत उमेदवारांमध्ये भाजपच्या भारती पवार यांचा समावेश आहे. दिंडोरी मतदारसंघातून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दिंडोरी लोकसभा (Dindori Loksabha) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार केंद्रिय मंत्री भारती पवार यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी लाखोंच्या मतांनी (1 लाख 13 हजार 199) पराभव करत जायंट किलरची भूमिका निभावली आहे.
या लढतीत भास्कर भगरे यांनी सुरूवातीपासून बाजी मारत केंद्रिय राज्यमंत्र्यांचा पराभव करण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय जनता पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांनी 1 लाख 03 हजार 632 मते घेतली आहेत.
Lok Sabha Result 2024 (Dindori) : मतांची आकडेवारी….
1. भास्कर भगरे (राष्ट्रवादी, शरद पवार गट) 5 लाख 77 हजार 339
2. भारती पवार (भाजप) 4 लाख 64 हजार 140
3. बाबू सदू भगरे(अपक्ष) 1 लाख 03 हजार 632