Lok Sabha Result 2024 | लोकसभा निवडणूकींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार अमरावतीत आतापर्यंत झालेल्या लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पहिल्या कलामध्ये आघाडी मिळाली आहे. दरम्यान, अमरावतीत तिहेरी लढत पाहायला मिळाली. प्रहार कडून दिनेश बुब यांना मैदानात उतरवण्यात आले होते.
आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी प्रहार कडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. पण त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र सध्या समोर आलेल्या मतमोजणी नुसार अमरावतीतून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पहिल्या कलामध्ये आघाडी मिळाली आहे. बळवंत वानखडे यांना 43388 मते मिळाली आहेत. दरम्यान, यंदा अमरावती लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात 63.67 टक्के मतदान झाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अमरावतीत कोण विजय मिळवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.