Beed Lok Sabha Constituency Result 2024: लोकसभा निवडणूकीसाठी सर्व टप्प्यांतील मतदान संपले असून मंगळवारी (दि. 4 जून) रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान राज्यातील बहुचर्चित बीड लोकसभा मतदार संघाचा निकाल लागणार आहे. मॉक पोलमुळे जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, बीडकरांना विजयाचा जल्लोष करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? याचं उत्तर राज्यातील निकालांत सर्वात शेवटीच पाहायला मिळणार आहे. (
माजलगावधील बूथवरील सर्वात शेवटी मोजणी –
माजलगाव शहरातील बुथ क्रमांक 68 वरील मतमोजणी सगळ्यात शेवटी केली जाणार असल्याचे आता प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मॉक पोलवेळी जे 50 मतदान केले होते, त्याच्या चिठ्ठ्या मिशनमधून बाहेर काढून टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे, प्रशासनाने या मॉक मतदान केंद्रावरील मतमोजणी सर्वात शेवटी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बीडमध्ये एकूण 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात व ईव्हीएम मशिनवर आहेत. त्यामुळेही येथील मतमोजणीला विलंब लागणार आहे.
मॉक पोलवेळी मतदानाच्या 50 चठ्ठ्या तशाच राहिल्या –
बीड लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणी ही सगळी मतमोजणी संपल्यानंतर सर्वात शेवटी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कारण, मतदानादिवशी सर्वप्रथम सकाळी मतदानापूर्वी मॉक पोल घेण्यात आले होते. या मॉक पोलमध्ये 50 मतदान केले जाते, ह्या 50 मतदानाच्या चिठ्या बाहेर काढून टाकाव्या लागतात आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करावी लागते. मात्र, ह्या मॉक पोलवेळी मतदानाच्या 50 चठ्ठ्या तशाच राहिल्याने शेवटी आज जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, या बुथ केंद्रावरील मतमोजणी सर्वात शेवटी केली जाणार आहे.
पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच –
दरम्यान, लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी सोशल मीडियावरची देखरेख वाढवली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रुप अॅडमिनवर बीड पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. बीडमध्ये यंदाच्या निवडणुकीत जातीय तेढ पाहायला मिळाले. त्यातच, मुंडेवाडी गावातील एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियातूनही जातीय मतभेदाला खतपाणी घालण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच, लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी सोशल मीडियावर वॉच ठेवला आहे. ( Lok Sabha Result 2024)