Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांचे मतदान पार पडले आहे, उर्वरित तीन टप्प्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. उमेदवारांपासून ते स्टार प्रचारक आणि नेते अगदी घरोघरी जाऊन मत मागत आहे.. या सगळ्यात हिमाचल प्रदेशात एक असं गाव आहे जिथे आजपर्यंत एकही नेता मत मागायला पोहोचलेला नाही. हे गाव हिमाचल प्रदेशातील बैजनाथमध्ये येते, ज्याचे नाव बडा भंगाल आहे.
गावात फक्त १५९ गावकरी राहतात. यंदा या गावात मतदानासाठी हेलिकॉप्टरने ईव्हीएम मशीन पाठवण्यात येणार आहे. आजपर्यंत एकही नेता बैजनाथच्या अतिदुर्गम भागात असलेल्या बडा भंगळमध्ये प्रचारासाठी किंवा मते मागण्यासाठी आलेला नाही. याचे कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी अवघड आणि दुर्गम रस्ते. बडा भंगळ गावात पायी जाण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतात.
मिळलेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाळ आणि तत्कालीन ऊन फेडरेशनचे अध्यक्ष त्रिलोक कपूर हेलिकॉप्टरमधून बडा भंगल पंचायतीमध्ये पोहोचले आणि लोकांना संबोधित केले. यानंतर 2018 मध्ये प्रथमच बैजनाथचे तत्कालीन आमदार मुलख राज प्रेमी यांनी हेलिकॉप्टरमधून बडा भंगळला भेट दिली. मात्र, आजपर्यंत एकही नेता मतदानादरम्यान प्रचारासाठी आलेला नाही.
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील सर्वात दुर्गम पंचायत असलेल्या बडा भंगालमध्ये सध्या राहणाऱ्या १५९ मतदारांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आधीच सर्व तयारी पूर्ण केली आहे.
१ जून रोजी मतदान होणार…
हिवाळ्यात हे गाव राज्याच्या इतर भागापासून तुटलेले राहते, त्यामुळे बहुतेक रहिवासी इतर गावांमध्ये स्थलांतरित होतात. हिमाचल प्रदेशबद्दल बोलायचे तर, येथे एकाच टप्प्यात ४ जागांसाठी मतदान होणार आहे, जे सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात (१ जून), ज्यामध्ये कांगडा, मंडी, हमीरपूर आणि शिमला या जागांचा समावेश आहे.
हे वाचाल का ? कंगना राणावतवर 8 गुन्हे दाखल तर १७ कोटींचे ‘कर्ज’