अकोले, (प्रतिनिधी) – तालुक्यातील (स्थानिक) पर्यटनासाठी पर्यटनकर न आकारण्याबाबतच व रेशन कार्डधारकांना ई- केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याचे निवेदन तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांना ग्राहक पंचायतीचे अकोले शाखेचे अध्यक्ष दत्ता शेणकर, मच्छिंद्र मंडलिक, महेश नवले, रमेश राक्षे यांनी दिले
अकोले तालुक्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळी वन विभाग व पर्यटन विभागाने जागोजागी टोलनाके टाकून पावती फाडली जाते. पावती घेऊ नये असा आमचा होरा नाही, मात्र तालुक्यातील पर्यटकांकडून जबरदस्तीने पावती फाडून अरेरावी केली जाते.
ती पावती स्थानिक अकोले तालुक्यातील लोकांकडून घेऊ नये. अशी अकोलेकरांची मागणी आहे, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी कचेरीसमोर उपोषण व आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
अकोले हा आदिवासी तालुका असून, रेशनकार्डमधील कुटुंबाचे नावे ई – केवायसी वेबसाईट (रेंज) व सर्वर डाऊन होते. त्यामुळे अनेक वृध्द, दिव्यांग रुग्ण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक , महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे अनेक अडचणी येत असल्यामुळे पुरवठा विभागाने दिलेली शेवटची तारीख ३० जून रोजी असून दोन ते तीन महिन्याची मुदवाढ मिळावी. निवेनावर ग्राहक पंचायत शाखाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, महेश नवले, दत्ता शेनकर, रमेश राक्षे, राम रूद्रे,
रामदास पांडे, नरेंद्र देशमुख, दत्ता ताजणे, भाऊसाहेब नाईकवाडी, माधवराव तिटमे , गणेश कानावडे, भगवान करवर, सचिन खरात, बाळासाहेब नवले, प्रमोद धराडे, ज्ञानेश पुंडे, कैलास तळेकर, पांडुरंग पवार, ॲड. दीपक शेटे, सुनिल देशमुख, भाऊसाहेब वाळुंज, रामहारी तिकांडे, नवनाथ आवारी, प्रमोद मंडलिक आदिंची नावे आहेत.