T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2, Toss update) :- टी-20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघाला ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाकडून आणि सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो.
ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला विलंब होत आहे. गयानामध्ये सध्या पाऊस पडत नाही. मात्र, ढगाळ वातावरण आहे. भारत आणि इंग्लंडचे खेळाडू आपापल्या ड्रेसिंग रूममध्ये आहेत.
Guyana 📍
The toss between India and England has been delayed due to rain ☔#T20WorldCup | #INDvENG | 📝: https://t.co/AXRcwJUYYq pic.twitter.com/X77DZL4hQf
— ICC (@ICC) June 27, 2024
पंचांनी भारतीय कर्णधाराशीही चर्चा केली. सध्या मैदानावर पाणी असून नाणेफेक होण्यास विलंब होणार आहे. पंच पुन्हा मैदानाची पाहणी करून वेळेत निर्णय घेतील. मैदानावर अजूनही कव्हर्स आहेत.
बीसीसीआयनेही केली पुष्टी, टॉसला होणार उशीर….
🚨 UPDATE from Guyana 🚨
Toss delayed due to rain 🌧️
Stay Tuned for more updates. ⌛️
Follow The Match ▶️ https://t.co/1vPO2Y5ALw #T20WorldCup | #TeamIndia | #INDvENG
📸 ICC pic.twitter.com/kNLLjbv4El
— BCCI (@BCCI) June 27, 2024
ताज्या अपडेटनुसार, गयानामध्ये पाऊस थांबला आहे. मात्र, आकाशात काळे ढग आहेत. सध्या खेळपट्टीवर कव्हर्स आहेत. स्टेडियमवरही खूप कमी प्रेषक उपस्थित आहेत.