T20 World Cup 2024 Semifinals : टी-20 विश्वचषक 2024 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ते 4 संघही निश्चित झाले असून जे यंदाच्या उपांत्य फेरीत खेळताना दिसणार आहेत. अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर आता सर्व समीकरणे स्पष्ट झाली आहेत. एवढेच नाही तर अफगाणिस्तानने शानदार आणि धमाकेदारपणे उपांत्य फेरीत प्रवेश केला असतानाच ऑस्ट्रेलियाचा खेळही संपला आहे. यासोबतच आता सर्वांना सेमीफायनलची प्रतीक्षा आहे, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघही खेळताना दिसणार आहे.
चारही संघ विजेतेपदाचे दावेदार…
आता या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात फक्त चार संघ उरले आहेत, जे विजेतेपदाचे दावेदार आहेत, बाकीचा खेळ संपला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने आधीच त्यांची जागा बुक केली होती. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यावर टीम इंडियाचे स्थानही निश्चित झाले. यानंतर आज जेव्हा अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला तेव्हा तो अधिकच रंजक झाला. या सामन्यात तीन संघांचे भवितव्य ठरणार होते. हा सामना संपण्यापूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचे संघही उपांत्य फेरीचे दावेदार होते, परंतु सर्वांनाच झुगारून देत अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करण्यातच यश मिळविले नाही तर प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला.
आता उपांत्य फेरीबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने येतील, तर दुसऱ्या लढतीत भारताचा सामना इंग्लंडशी होईल. भारतीय वेळेनुसार, हे दोन्ही उपांत्य फेरी एकाच दिवशी म्हणजेच 27 जून रोजी खेळवले जातील.
पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजल्यापासून खेळताना दिसतील. हा सामना तरौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये होईल तर त्याच दिवशी संध्याकाळी 8 वाजल्यापासून भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हे सामने जिंकणारे संघ अंतिम फेरीत धडक मारतील आणि त्यानंतर टी-20 विश्वचषक विजेतपेपदाचा सामना 29 जून रोजी बार्बाडोस येथे होईल. त्यानंतरच क्रिकेटजगताला यंदाचा नवा चॅम्पियन मिळेल.
कोणी अन् किती वेळा मारली ए उपांत्यफेरीत धडक?
दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषकात दोनदा उपांत्य फेरीचे सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेला दोन्ही वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने तीनदा उपांत्य फेरीचे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी दोनदा उपांत्य फेरी जिंकली आहे आणि नंतर अंतिम सामना खेळून विजय मिळवला आहे. भारताने तीनदा उपांत्य फेरीचे सामने खेळले आहेत. यापैकी भारताने फक्त एकदाच उपांत्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे आणि टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अफगाणिस्तान प्रथमच टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळणार आहे.
Team India Head Coach : मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी गौतम गंभीरने ठेवल्या पाच अटी, जाणून घ्या….
टी-20 विश्वचषक हेड-टू-हेड रेकाॅर्ड…
1. दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान – टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचे संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा वर्चस्व राहिले आहे. हे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. 2016 मध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 37 धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या वेळेस अफगाणिस्तानला 59 धावांनी पराभूत केले होते.
2. भारत विरुद्ध इंग्लंड – टी- 20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड चार वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.