Legislative Council Deputy Speaker Election। राज्यात सध्या विधान परिषदांच्या निवडणुकांसाठी राजकीय वर्तुळात धावपळ सुरु आहे. या सगळ्यात राज्याचं पावसाळी अधिवेशन देखील सुरू आहे. यातच विधानपरिषदेच्या उपसभापतीच्या निवडीवरुन सध्या होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. त्यामुळे आता विधान परिषदेच्या उपसभापती निवडीसाठी गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या नावाची चर्चा Legislative Council Deputy Speaker Election।
उपसभापती निवडीबाबत गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. तसेच उपसभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते. त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो. तर दुसरीकडे उपसभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
विधान परिषदेत भाजपचा उपसभापती असावा Legislative Council Deputy Speaker Election।
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपुरात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, असं वक्तव्य केलं होतं. विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, यासाठी महायुतीतील 11 घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेऊ, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.
विधान परीषद सभापती निवडणुकीबाबत निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक विशेष बैठक पार पडणार आहे. विधान परिषदेतील सदस्य आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधान परीषद सभापती पदासाठी नावं द्या, आम्ही बिनविरोध करतो, असं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आजची मुख्यमंत्र्यांची बैठक महत्वाची मानली जात आहे. तसेच काल विधान परीषदेत शिवीगाळ प्रकरण घडलं, त्या प्रकरणी देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच, या प्रकरणात नेमकं काय घडलं? याचा देखील आढावा मुख्यमंत्री घेणार असल्याचे म्हटले जात आहे.