Latur NEET Exam Paper Leak । देशातल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे लातूर कनेक्शन आता थेट माढापर्यंत पोहोचलंय. या प्रकरणात दोन्ही शिक्षकांना दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. त्यापैकी संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता.
नीट प्रकरणातील आरोपी शिक्षक संजय जाधवने पोलिसांच्या चौकशीनंतर पोबारा केला होता. आता अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या संजय जाधवबाबत शिक्षण विभागात अधिकृतरीत्या कोणताही अहवाल पोलिसांकडून देण्यात आलेला नाही.
माढ्यातील प्राथमिक शाळेत उपशिक्षक Latur NEET Exam Paper Leak ।
संशयित आरोपी उपशिक्षक संजय जाधव 26 जून 2023 पासून माढा तालुक्यातील टाकळी प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याअगोदर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली देऊळ जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून 10 सप्टेंबर 2003 रोजी शाळेत हजर होऊन नियुक्त झाला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सावंतवाडी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मडुरे नंबर 3 शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर तिथून तो 2 मे 2023 रोजी कार्यमुक्त होऊन टाकळी येथे रुजू झाला होता. तो आजपर्यंत येथीलच शाळेवर कार्यरत आहे.
“माझी पत्नी मनोरुग्ण…”, सांगून अक्कलकोटला बदली Latur NEET Exam Paper Leak ।
नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या बदलीमध्ये त्यानं आपली पत्नी मनोरुग्ण असल्याचं दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. मात्र, अद्याप संजय जाधवला टाकळी येथून कार्यमुक्त करण्यात आलेलं नाही. पण 15 जूनला शाळा सुरू झाल्यापासून तो जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलाच नसल्याचं त्याच्या गैरहजेरीवरुन स्पष्ट झालंय.
शाळेवर पोटशिक्षक म्हणून नियुक्ती पण लातूरमध्ये क्लासेस
नीट परीक्षा घोटाळ्यातील संशयित शिक्षक संजय जाधवानं दहा हजार रुपये देऊन पोटशिक्षकाची नेमणूक केली होती. आणि स्वतः लातूरमध्ये क्लास घेत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. तसेच, एवढंच नव्हे तर अक्कलकोट तालुक्यात बदलीसाठी पत्नीलाही जाधव यांनी मनोरुग्ण दाखवलं असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. याबाबत त्या शिक्षकाची चौकशीच्या मागणीचं निवेदनही जगताप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे केलीय.
हेही वाचा
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण ; लातूरच्या फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू