Maharashtra Sadan In Kashmir| जम्मू – काश्मीरला जगभरातील अनेक पर्यटक भेट देण्यासाठी जातात. निसर्गाचे अद्भूत सौंदर्य पाहण्याचा आनंद येथे लाखो पर्यटक घेतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनही हजारो पर्यटक काश्मीरमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी काश्मीरला जात असतात. यातच आता महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये आता लवकरच महाराष्ट्र सदन उभारले जाणार आहे. त्यादृष्टीने सरकारकडून पाऊल देखील टाकण्यात आले आहे.
महाराष्ट्र सदन उभारणीसाठी केली जमीन खरेदी
त्यासाठी येथे जमीन देखील खरेदी करण्यात आली आहे. बडगाम येथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनासाठी 2.50 एकर जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारने 9 कोटी 30 लाख 24 हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. केंद्र सरकारने येथील कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरमध्ये आता कोणीही भारतीय नागरिक जमीन खरेदी करु शकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सदन उभारणीसाठी जमीन खरेदी केली आहे. Maharashtra Sadan In Kashmir|
जम्मू आणि काश्मीर सरकारने बडगाम जिल्हयातील इच्चगाम तालुक्यातील 2.50 एकर जमीन महाराष्ट्र सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान करण्यात आली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-काश्मीर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच या भूखंडावरील जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कशा स्वरुपाचे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याच्या नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. Maharashtra Sadan In Kashmir|
राज्य सरकारची अंतरिम अर्थसंकल्पात 77 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन’ बांधण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी केली होती. जम्मू काश्मीरसह उत्तर प्रदेशातअयोध्यामध्येही बांधण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र सदन’ साठी राज्य सरकारने 77 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे, याबाबतची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केलेल्या राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान केली होती. त्यानुसार आता राज्य सरकारकडून जम्मू-कश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यात आली आहे. Maharashtra Sadan In Kashmir|
हेही वाचा: