कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन गाड्यांनी पाठीमागच्या बाजूने डंपरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. कोल्हापुरातील सांगली फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. पुणे -बेंगळुरू मार्गावर हा अपघात झाला असून या अपघातात दोन गाड्यांचा चक्काचूर झालाय
पुण्याकडून बेंगलोरच्या दिशेला जाणाऱ्या डंपरला पाठीमागून येणाऱ्या दोन गाड्यानी जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. एका गाडीने मागून डंपरला जोरदार धडक दिली. त्यामध्ये गाडीचे बोनेट थेट डंपरच्या मागच्या बाजूने आत घुसले. तर त्या मागच्या गाडीने पुढच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये मागच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात दोन्ही गाड्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. फक्त एका महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.