Nashik Teacher Constituency Election| विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जूनला मतदान पार पडले होते. त्यानंतर सोमवारी 1 जुलै रोजी मतमोजणी झाली. मात्र नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तासांपासून सुरुच होती.
नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे दिसले. अखेर किशोर दराडेंनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला.
पाच मतपत्रिका जास्त
नाशिक मतदारसंघात पैशांच्या वाटपाच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक गाजली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. अखेर प्रदीर्घ काळानंतर येथील विजयी उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेत एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळल्या होत्या.
नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 आणि चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळल्या होत्या. यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. मात्र वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे. Nashik Teacher Constituency Election|
चौरंगी लढत
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात होते. महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत पार पडली. Nashik Teacher Constituency Election|
तर दुसरीकडे विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून, तर कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखले आहे.
हेही वाचा:
उत्तरप्रदेशात भाजपचा बालेकिल्ला का ढासळला? ; आढावा अहवालात पराभवाची 12 कारणे समोर