बारामती: (प्रतिनिधी)- अध्यात्मिक मार्गातून सामाजिक सेवा केल्याने आनंद व समाधान मिळते. सामान्य व्यक्तींना काशी अयोध्याचे दर्शन घडविण्याचे काम केल्याने पुण्य मिळते. २००६ पासून अविरत सेवा चालू असल्याचे प्रतिपादन लोकविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष व शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील यांनी प्रतिपादन केले.
आर्थिकदृष्ट्या दुबल, पैसे आहेत काही तंत्रिक कारणास्तव जाता येत नाही, वेळ आहे. पण पैसे नाही. अपंग, विकलांग आशा सर्वांसाठी लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत काशी अयोध्या धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे प्रस्थान सोमवार (दि.२४) रोजी तांदूळवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन अधीक्षक हनुमंत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, युवकचे अध्यक्ष अविनाश बांदल,
महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, सुभाष सोमाणी, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, नगरसेवक अतुल बालगुडे, संतोष गलिंदे, नवनाथ बल्लाळ, दीपक मलगुंडे, प्रा. अजिनाथ चौधर, दिनेश जगताप, विशाल जाधव,
पार्थ गालिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बारामती जिल्हा संघचालक दीपक पेशवे, विवेक पांडकर, सेवा भारतीचे अध्यक्ष संदीप देशपांडे, उद्योजक मंगेश मासाळ, भाजपा तालुकाध्यक्ष जगदीश कोळेकर, वैभव सोलंकर,
सिद्धनाथ भोकरे, संतोष सातव, मंगेश गिरमे, नवनाथ चौधर, परवेज सय्यद उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात भाविकांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले
बारामती मधील पहिली काशी यात्रा संपन्न करून दातृत्व दाखवले व अत्याधुनिक शतकात काशी व अयोध्या यात्रा संपन्न करून धार्मिक, अध्यात्मिक वैज्ञानिक सांगड लोकविकास प्रतिष्ठान ने घालून आदर्श निर्माण केल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले. सचिन सातव, सुभाष सोमाणी व विवेक पांडकर, प्रा अजिनाथ चौधर आदींनी लोकविकास प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
आतापर्यंत २७८० भाविकांना लाभ
जय पाटील म्हणाले की, मोफत काशी यात्रेचा लाभ २७८० भाविकांनी आतापर्यंत घेतला असून यावर्षी ६१० भाविकांना काशी व अयोध्या दर्शन होणार आहे. प्रवास, जेवण, राहणे या सेवा दिल्याने परमेश्वराची सेवा केल्याची अनुभूती येत असून सामाजिक, पर्यावरण व विविध सेवेसाठी लोकविकास प्रतिष्ठान कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.