Kangana Ranaut| अभिनेत्री कंगणा राणावतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत अनेकदा विविध माहिती समोर येत होती. यातच आता कंगणाने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.
25 जून 1975 साली देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त कंगणाने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.
कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट यापूर्वी 14 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता, परंतु मेमध्ये निर्मात्यांनी एक निवेदन शेअर केले होते की ते पुढे ढकलले जात आहे. पुढे ढकलल्यानंतर नवीन पोस्टरसह चित्रपटाची नवीन तारीख शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
View this post on Instagram
चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘स्वतंत्र भारताच्या सर्वात गडद अध्यायाच्या 50 व्या वर्षाची सुरुवात.” कंगणाने चित्रपटाची रिलीज डेट घोषित करताच अनेकांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट इंदिरा गांधींचा बायोपिक नसेल आणि त्याचे स्वरूप पॉलिटिकल ड्रामा असणार असल्याचे कंगणाने म्हंटले होते.
या चित्रपटात कंगना केवळ मुख्य भूमिकेत दिसणार नाही तर तिने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. कंगनासोबतच अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे हेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा:
लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही; के सुरेश भरणार उमेदवारी अर्ज