Sanjay Raut on Kangana Ranaut| लोकसभेच्या नवनियुक्त खासदार व अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. कंगना यांनी महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री कक्षाची मागणी केली आहे. तात्पुरत्या निवासासाठी खोल्यांची पाहणी करण्यासाठी त्या सदनात आल्या होत्या. परंतु येथील रूम छोट्या असल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांची रूम मिळावी, अशी मागणी कंगना यांनी केली असल्याचे म्हंटले जात आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कंगणा यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत यांचे ट्वीट
संजय राऊत यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एक्स मिडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ”बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहात आहेत श्रीमतीजी,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
बापरे!
श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडूनआल्याआहेत.
त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी.
हिमाचलभवनयेथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळतअसेलतर काहीच हरकत नाही.
महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहातआहेत श्रीमतीजी…… https://t.co/8Dt0TFRzp6— Sanjay Raut (@rautsanjay61) June 24, 2024
मात्र, राणावत यांनी मुख्यमंत्री कक्षाची निवासासाठी कोणतीही मागणी केलेली नव्हती. सदनामध्ये येऊन राणावत यांनी खोल्यांची पाहणी केली, असे सदनाच्या सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाचा तपास करून कोणत्याही व्यक्तीस मुख्यमंत्री स्यूट देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला फोनवरून मुख्यमंत्री कक्षासंदर्भात विचारणा केली, अशी चर्चा रंगली होती.
दरम्यान, कंगना राणावत या बॉलिवूड अभिनेत्री असून आता हिमाचल प्रदेशातील मंडी येथून त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 जिंकून खासदार बनलेल्या नेत्यांनी काल संसद भवनात शपथ घेतली. यावेळी कंगना राणावत यांनीही शपथ घेतली आहे. मात्र आता कंगणा यानी केलेल्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हेही वाचा: