वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या कमला देवी हॅरिस या कृष्णवर्णिय सिनेटर महिलेची प्रथमच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडले गेल्याने त्यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे. यातच कमला हॅरिस यांचे बॉलिवूडमधील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे त्यांचे कमला हॅरिस यांच्या सोबत खास कनेक्शन असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मोठ्या भावाची मुलगी ही कमला हॅरिस यांच्या जवळची आहे असे त्यांनी ट्विट म्हटले आहे.
Heartiest congratulations! As the world is overjoyed with your @JoeBiden spectacular & most deserving win! Also we must not forget the desirable, elegant, wonderful,intelligent intellectual par excellence @KamalaHarris on her most expected win. Kudos! Here she is seen with my
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 8, 2020
शत्रुघ्न सिन्हा ट्विट
‘माझा मोठा भाऊ लखन सिन्हा यांची मुलगी, माझी पुतणी प्रीता सिन्हा ही कमला हॅरिस यांच्या जवळची आहे’ असे त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी प्रीता ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील सहभागी झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये जो बायडन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.