कल्याण : पुणे, नागपूरनंतर आता कल्याणमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. कल्याणमध्ये भरधाव जीपने दुचाकीस्वार तरुणींना धडक दिली आहे. या अपघातानंतर कार चालक कार घेऊन घटनास्थळावरून फरार झाला आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
काय घडले नेमके?
कल्याणमधील रिंग रोडवर हा अपघात झाला आहे. कल्याणच्या रिंग रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर गाडी घेऊन चालक पसार झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही तरुमी गंभीर जखमी झाल्या आहेत. सेजल भानुशाली, समीक्षा भानुशाली अशी या अपघातात जखमी झालेल्या तरुणींची नावे आहेत.
या दोन्ही तरुणी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनी आहेत. घरी परतत असताना हा अपघात झाल्याचे समजत आहे. ज्या कारने या दोन तरुणींना धडक दिली त्या कारवर देवा गृप लिहिले असल्याचे समोर आले आहे. या अपघात प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी जीप चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.