K Suresh । लोकसभा निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत होत असले तरी भारतीय इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेचा अध्यक्ष ठरवण्यासाठी निवडणूक होणार आहे. इंडिया अलायन्स काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांना सभापतीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले, त्यानंतर त्यांनी तातडीने उमेदवारी दाखल केला. दुसरीकडे भाजप खासदार ओम बिर्ला यांनीही एनडीएच्या वतीने सभापतीपदासाठी उमेदवारी दाखल केला आहे.
दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ओम बिर्ला आज मंगळवारी या संदर्भात नामांकन दाखल करणार आहेत. लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लोकसभा अध्यक्षांच्या नावावर एकमत निर्माण करण्याच्या सत्ताधारी एनडीएच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांशी संपर्क साधला. त्याचवेळी लोकसभेच्या उपसभापती पदाबाबतही चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. मात्र यावेळी त्यांनी पाठिंब्याबाबत अट ठेवली असल्याची माहिती समोर आलीय.
No consensus on Speaker’s post. INDIA bloc is likely to field its candidate for the post of Speaker of the 18th Lok Sabha: Sources pic.twitter.com/seZyieAIhS
— ANI (@ANI) June 25, 2024
K Suresh । कोण आहे के सुरेश ?
– के सुरेश यांच्या बद्दल बोलायचे झाले तर ते काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत आणि आठव्यांदा विजयी होऊन लोकसभेत पोहोचले आहेत.
– के सुरेश हे केरळमध्ये काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते आठव्यांदा मावेलिक्कारा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी यापूर्वी चार वेळा या मतदारसंघाचे आणि यापूर्वी अदूर मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधीत्व केले आहे.
के सुरेश पहिल्यांदा 1989 मध्ये लोकसभेवर निवडून आले होते आणि 2009 पासून ते सतत मावेलिक्कारा जागा जिंकत आहेत. 2009 मध्ये त्यांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री म्हणून बढती मिळाली.