Pankaja Munde| भाजपकडून विधान परिषदेसाठी पाच नावांची घोषणा करण्यात आली. लोकसभेत पराभव झाल्यानंतर आता विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. यानंतर आता पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.
पंकजा म्हणाल्या की, “मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात मला संधी दिली आहे. जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे आभार मानते.”
यावेळी पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. “मला प्रतीक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे. मला आज जे काही मिळत आहे. ते माझ्यासाठी बलिदान दिलेल्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी समर्पित करते,”असे पंकजा मुंडे विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी भावूक झाल्याचे दिसले.
भाजपकडून पाच जणांना संधी
दरम्यान, भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे. Pankaja Munde|
पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदार संघातून पराभव झाला. परंतु आता विधान परिषदेची उमेदवारी देऊन भाजपाने त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे. यापूर्वी पंकजा मुंडे यांचा 2019 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यावेळीही त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र यावेळी त्यांना संधी देण्यात आली आहे. Pankaja Munde|
हेही वाचा:
विधानपरिषदेच्या उपसभापतीच्या खुर्चीवर कोण बसणार? ; भाजपकडून ‘या’ दिग्गज नेत्यांच्या नावांची चर्चा