ओटावा : कॅनडाने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या इराणच्या सशस्त्र दलाच्या शाखेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी काल याची घोषणा केली. इस्लामिक रिव्होल्युनरी गार्ड कॉर्प्सच्या दहशतवादी कारवायांचा सामना करण्यासाठी कॅनडा सर्व साधने वापरेल, असे ते यावेळी म्हणाले.
इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या वरिष्ठ सदस्यांसह हजारो वरिष्ठ इराणी सरकारी अधिकाऱ्यांना आता कॅनडामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि यापैकी जे आधीच कॅनडामध्ये आले आहेत त्यांची चौकशी करून त्यांना देशाबाहेर घालवून दिले जाऊ शकते. बंदी घातलेल्या व्यक्तींचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीमध्ये करण्यात येणार आहे.
या सूचीचा तात्काळ परिणाम म्हणून, बँका आणि ब्रोकरेज यांसारख्या कॅनेडियन वित्तीय संस्थांना, सूचीबद्ध घटकाची मालमत्ता ताबडतोब गोठवणे आवश्यक आहे. कॅनडा आणि परदेशातील कॅनेडियन लोकांनी जाणीवपुर्वक अशा व्यक्तीं किंवा दहशतवादी गटाकडून नियंत्रित, मालकीच्या मालमत्तेशी व्यवहार करणे हा फौजदारी गुन्हा असणार आहे.
धर्मादाय संस्थांनी दहशतवादी गटांशी संबंध कायम ठेवल्यास त्यांचा दर्जा गमावू शकतात आणि त्या गटांशी संबंधित असलेल्या लोकांना कॅनडामध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकतो, असेही लेब्लँक यांनी म्हटले आहे.