Dinesh Karthik & RCB Team : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी म्हणजेच आयपीएल 2025 साठी तयारी सुरू केली आहे. मात्र, आगामी हंगामापूर्वी फ्रँचायझीने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. खरंतर, आता विराट कोहलीचा मित्र, जो त्याच्या नेतृत्वाखाली खेळला आहे, तो त्याच्या ‘गुरू’ची भूमिका साकारणार आहे.
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिनेश कार्तिक आता फलंदाजी प्रशिक्षक आणि आरसीबीच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिनेश कार्तिकची फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. याची माहिती खुद्द आरसीबीने सोशल मीडियावर दिली आहे.
Welcome our keeper in every sense, 𝗗𝗶𝗻𝗲𝘀𝗵 𝗞𝗮𝗿𝘁𝗵𝗶𝗸, back into RCB in an all new avatar. DK will be the 𝗕𝗮𝘁𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 𝗮𝗻𝗱 𝗠𝗲𝗻𝘁𝗼𝗿 of RCB Men’s team! 🤩🫡
You can take the man out of cricket but not cricket out of the man! 🙌 Shower him with all the… pic.twitter.com/Cw5IcjhI0v
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) July 1, 2024
आरसीबीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमच्या कीपरचे प्रत्येक स्तरातून स्वागत आहे. दिनेश कार्तिक आरसीबीमध्ये पूर्णपणे नवीन अवतारात परतला आहे. डीके आता आरसीबी पुरुष संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असणार आहे. तुम्ही त्या माणसाला क्रिकेटमधून बाहेर ठेवू शकता पण क्रिकेटला माणसाच्या बाहेर नाही!”
कार्तिक अनेक फ्रँचायझींसोबत खेळला, पण आरसीबीच खास..
कार्तिकने 2008 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (तत्कालीन दिल्ली डेअरडेव्हिल्स) मधून आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सचा भाग बनला. त्यानंतर 2015 मध्ये कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला. यानंतर कार्तिक गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनला. त्यानंतर तो 2022 मध्ये आरसीबीमध्ये परतला आणि 2024 पर्यंत बेंगळुरूकडून खेळला. कार्तिकने 2024 नंतर निवृत्ती जाहीर केली होती. आता तो संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक बनला आहे.
कार्तिकची अशी होती आयपीएल कारकीर्द…
यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण 257 सामने खेळले आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 4 हजार 842 धावा झाल्या. कार्तिक हा गेल्या काही वर्षांपासून आयपीएलचा सर्वोत्तम फिनिशर आहे. कार्तिकच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 22 अर्धशतके आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 97 आहे. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये विकेटकीपिंग करताना 147 झेल घेतले आहेत आणि 37 वेळा स्टंपिंग केली आहे. कार्तिक हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधारही राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिकचे रेकॉर्डही चांगले आहेत. भारतासाठी दिनेश कार्तिकने 26 कसोटी सामन्यांमध्ये 1025 धावा, 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 धावा आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 686 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकने कसोटी सामन्यात 63 बळी, एकदिवसीय सामन्यात 71 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 बळी घेतले आहेत.