सासवड, (प्रतिनिधी) – जेजुरी-वाल्हे-नीरा परिसरातील पालखी विसाव्यांची पाहणीजेजुरी-वाल्हे-नीरा परिसरातील पालखी विसाव्यांची पाहणीजेजुरी-वाल्हे-नीरा परिसरातील पालखी विसाव्यांची पाहणीआळंदी ते पंढरपूर हा 965 पालखी महामार्गावरील झेंडेवाडी ते नीरा या महामार्गावरून पालखी जाणार असून या पालखी सोहळ्याआधी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे.
झेंडेवाडी ते नीरा दरम्यान असणार्या महामार्गावर कोणतेही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सासवड येथील उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्यासह प्रशासकीय अधिकार्यांनी पाहणे केली.
सासवड येथे असणार्या क-हा नदीवरील संत सोपानकाका सेतू बोरावकेमळा येथील पालखी विसावा त्याचबरोबर शिवरी येथील यमाई माता मंदिरासमोरील पालखी विसावा स्थळांची पाहणी करून पुढे जेजुरी-वाल्हे-नीरा परिसरातील पालखी विसाव्यांची पाहणी करण्यात आली.
सासवडच्य मुक्कामानंतर पालखी सोहळा हा बोरावके मळा येथे सकाळच्या चहापाण्यासाठी थांबतो यानंतर हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र यमाई माता मंदिरासमोर न्याहारीसाठी विसावला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते.
त्याचबरोबर पालखी महामार्गाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी फुलाचे काम सुरू आहे. हा पूल पालखी सोहळ्यामध्ये असणार्या वाहनांसाठी अपुरा पडणार आहे. हा पूल दोन्ही बाजूंनी रॅममुळे बंद होणार आहे. सासवडकडून पालखी मंदिराकडे जाताना मधल्या रस्त्यात पालखी बसणे कठीण होणार आहे.
यामुळे या ठिकाणी भुयारी मार्गांची संख्या, पुलाची लांबी वाढवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुलाखाली रिकामी जागा मोठ्या प्रमाणावर ठेवण्याची आवश्यकता आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत, पुरंदरच्या गटविकास अधिकारी अमिता पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता स्वाती दहिवाल, शिवरचे मंडल अधिकारी बापुसाहेब देवकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होता.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने श्रीक्षेत्र यमाई शिवरी येथे लांब पुलाची उभारणी केल्यास पुलाखाली जागा पालखी सोहळ्यासाठी वापरात येऊ शकते यासाठी पुलाची लांबी वाढवी व लांबी वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत हे काम बंद ठेवावे. – वासुदेव लिंभोरे, उपाध्यक्ष, श्रीक्षेत्र यमाई देवस्थान ट्रस्ट