BCCI & Team India Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2024-2025 देशांतर्गत हंगामासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताच्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेने होईल आणि टीम इंडिया त्याच संघासोबत तीन टी-20 सामनेही खेळणार आहे.
याशिवाय भारतीय संघ यावर्षी न्यूझीलंड आणि 2025 च्या सुरुवातीला इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. या देशांतर्गत हंगामात भारत 5 कसोटी, 3 वनडे आणि 8 टी-20 सामने खेळणार आहे.
भारत तीन देशांचे भूषवणार यजमानपद…
1. बांगलादेश – भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात प्रथम बांगलादेशचे यजमानपद भूषवणार आहे. हा दौरा 19 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई आणि कानपूर येथे 2 कसोटी सामने होणार आहेत. आणि 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दोन्ही संघ 3 टी-20 सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. हे 3 टी-20 सामने अनुक्रमे धरमशाला, दिल्ली आणि हैदराबाद येथे आयोजित केले जातील.
कसोटी मालिका : बांगलादेश संघाचा भारत दौरा
पहिली कसोटी – 19 ते 23 सप्टेंबर – चेन्नई – सकाळी 9.30 वाजता
दुसरी कसोटी – 27 ते 1 ऑक्टोबर – कानपूर – सकाळी 9.30 वाजता
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
6 ऑक्टोबर – पहिला टी-20 सामना – धरमशाला
9 ऑक्टोबर – दुसरा टी-20 सामना – दिल्ली
12 ऑक्टोबर – तिसरा टी-20 सामना – हैदराबाद
T20 World Cup 2024 (Super 8) : बांगलादेशविरूध्द पॅट कमिन्सच्या नावे झाली ‘ब्रोकन हॅटट्रिक’ची नोंद….
2. न्यूझीलंड – बांगलादेशविरुद्धची मालिका संपल्यानंतर 4 दिवसांनी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. किवी संघ 16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत भारतासोबत 3 कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना (16 ते 20 आॅक्टोबर) बेंगळुरूमध्ये, दुसरा (24 ते 28 आॅक्टोबर) पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना (1 ते 5 नोव्हेंबर) मुंबईत होणार आहे.
न्यूझीलंड संघाचा भारत दौरा
पहिली कसोटी -16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर – बंगळुरू – सकाळी 9.30 वाजता
दुसरी कसोटी – 24 ते 28 ऑक्टोबर – पुणे – सकाळी 9.30 वाजता
तिसरी कसोटी – 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर – मुंबई – सकाळी 9.30 वाजता
3. इंग्लंड – 2025 च्या नवीन वर्षात भारतासमोर पहिले आव्हान इंग्लंडचे असेल. इंग्लंडचा भारत दौरा 22 जानेवारीपासून सुरू होईल आणि 12 फेब्रुवारीला संपेल. सुमारे 3 आठवड्यांच्या आत भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. या आठही सामन्यांचे यजमानपद आठ वेगवेगळ्या मैदानांवर सोपवण्यात आले आहे.
भारत वि इंग्लंड 5 सामन्यांची टी-20 मालिका
22 जानेवारी 2025 – पहिला टी-20 सामना – चेन्नई – संध्याकाळी 7 वा.
25 जानेवारी 2025 – दुसरा टी-20 सामना – कोलकाता – संध्याकाळी 7 वा.
28 जानेवारी 2025 – तिसरा टी-20 सामना – राजकोट – संध्याकाळी 7 वा.
31 जानेवारी 2025 – चौथा टी-20 सामना – पुणे – संध्याकाळी 7 वा.
2 फेब्रुवारी 2025 – पाचवा टी-20 सामना – मुंबई – संध्याकाळी 7 वा.
भारत वि इंग्लंड 3 सामन्यांची वनडे मालिका
6 फेब्रुवारी 2025 – पहिला वनडे सामना – नागपूर – दुपारी 1.30 वा
9 फेब्रुवारी 2025 – दुसरा वनडे सामना – कटक – दुपारी – 1.30 वा
12 फेब्रुवारी 2025 – तिसरा वनडे सामना – अहमदाबाद – दुपारी 1.30 वा.
देशांतर्गत हंगामापूर्वी भारत झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार मालिका…
देशांतर्गत हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी भारत झिम्बाब्वेला भेट देणार आहे. 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.