कर्जत, (वार्ताहर) – येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवीन पदनिुक्त्याही करण्यात आल्या. वर्षभरापासून सुधाकर घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत सुरू असलेल्या इन्कमिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
यांनी बांधले मनगटावर घड्याळ –
भरत भगत यांच्या पुढाकारातून शिवसेनेचे पदाधिकारी अस्लम पानसरे, भाजपाचे फुरखान कुरेशी, जांभिवली येथील भुषण पाटील यांच्या पुढाकारातून दोन्ही शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, ग्रामपंचायत कशेळेमधील कवठेवाडी गावातील कार्यकर्ते आदींनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.