Vidya Balan Video| सोशल मीडियावर अनेक गाणी, डायलॉग यांचा ट्रेंड पाहायला मिळतो. इनस्टाग्रामवर नेटकऱ्यांसह सेलिब्रिटी देखील या ट्रेंडवर रील्स करताना पाहायला मिळतात. यातच सध्या ‘अतिशय युनिक अतिशय वेगळा’ या रॅपचा रिल तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याची भुरळ लहानांपासून मोठ्यांना देखील पडली आहे. अभिनेत्री विद्या बालन देखील यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विद्या बालनचा रिल अनेकांच्या पसंतीस पडला आहे. मराठी भाषेतील या गाण्यावर तिने उत्तम व्हिडिओ केला आहे. विद्या बालनने “आळस मला आलेला आहे… मी हे इन्स्पिरेशन अलोक राजवाडे आणि भाडिपाकडून घेतलंय” असं कॅप्शन रिल शेअर करत दिलेले आहे. भाडिपा, अलोक राजवाडे, अमृता सुभाष, सारंग साठ्येसह अनेक सेलिब्रिटींनी विद्या बालनच्या व्हिडिओवर कमेंट्स केली आहे.
View this post on Instagram
विद्याने मराठीमध्ये व्हिडिओ बनवल्यामुळे अनेकांनी तिचं कौतुक केले आहे. यापूर्वी देखील तिने मराठीमध्ये काही व्हिडिओ बनवले आहेत. दरम्यान, विद्या बालन शेवटची ‘दो और दो प्यार’मध्ये दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. Vidya Balan Video|
हेही वाचा:
राज्यात किती उपमुख्यमंत्री होऊ शकतात; काय सांगतो ‘कायदा’?