कोकण पदवीधर मतदारसंघासाठी नुकतेच मतदान झाले. अशात या मतदार संघातून भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता चांगलेच चर्चेत आले आहे. नरेंद्र मेहता यांनी मतदानाच्या दिवशी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र या पोस्टमुळेखळबळ उडाली आहे.
नरेंद्र मेहता यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की,’आम्ही मतदानाचे कर्तव्य पूर्ण केले’ मात्र २०१९ साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ ८ वी उत्तीर्ण असलेले नरेंद्र मेहता अचानक पदवीधर कसे झाले? असा सवाल उपस्थित झाला. ही पोस्ट व्हायलर होताच त्यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये न ‘मतदान केले’ ऐवजी ‘मतदान करा’ असे लिहिले. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी सपत्नीक दिसत आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही मतदानाचा हक्क बजावला. तुम्ही देखील योग्य उमेदवार निवडा असे आवाहन करण्यात आले होते. फोटोत मेहता दांपत्याने बोटाला शाई लावल्याचे दाखवले होते. मात्र मेहता हे केवळ आठवी पास असल्याचे त्यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. त्यामुळे अचानक पदवीधर निवडणुकांमुळे त्यांनी मतदान केले कसे असा सवाल विरोधकांनी केला आहे. मतदार यादीत नाव नसताना मेहता केंद्र परिसरात कसे फिरत होते असा सवालही विरोधकांनी केला आहे.