Lok Sabha Speaker Election 2024 | लोकसभा निवडणुकीनंतर आता 24 जून रोजी संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार आहे. यानंतर 26 जून रोजी संसदेच्या नवीन अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. लोकसभा हे देशाचे सर्वोच्च विधीमंडळ आहे. सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी सभापतीची निवड केली जाते. मात्र लोकसभा अध्यक्षपद कसे निवडले जाते? त्यांचे काय आणि आधिकार काय असतात ? याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात…
लोकसभा अध्यक्षांची निवड कशी केली जाते?
भारतीय संविधानातील कलम 93 नुसार, लोकसभेच्या अध्यक्षपदाची जाग रिकामी झाल्यास त्याबाबत बैठक घेऊन निवडून आलेल्या खासदारांपैकी दोघांची निवड करावी लागते. यासाठी सभापती हा सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक असते. याशिवाय अध्यक्षपदासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची तरतूद नसते.
अध्यक्षपद भूषवणाऱ्या व्यक्तीसाठी देशाची घटना आणि कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असते. सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या साध्या बहूमताने ही निवड केली जाते. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची नेमणूक लोकसभा अध्यक्ष म्हणून केली जाते. तर उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाला दिले जाते. सहसा सत्ताधारी पक्षाचाचे सदस्य अध्यक्ष होतात. उमेदवार निश्चित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किंवा पंतप्रधान त्यांचे नाव सभापती पदासाठी प्रस्तावित करतात. त्यानंतर अध्यक्षाची निवड एकमताने केली जाते.
लोकसभा अध्यक्षांचे अधिकार कोणते ?
संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी अध्यक्षांचे प्रमुख काम असते. लोकसभेचे अध्यक्षही दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भुषवतात. सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्या कमी असेल तर सभापती सभा तहकूब करू शकतात किंवा सभा स्थगित करू शकतात. कोणत्याही प्रस्तावावर मतदानाच्या वेळीही अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. कोणत्याही प्रस्तावावर मतदानाच्या वेळीही अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. Lok Sabha Speaker Election 2024 |
एखाद्या सदस्याने सभागृहात अयोग्य वर्तन केल्यास त्यांना निलंबित करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे असतो. एखाद्या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडून समान मते पडल्यास या स्थितीत लोकसभा अध्यक्षांना मतदानाचा अधिकार असतो. सभागृहाच्या समित्या सभापतींद्वारे स्थापन केल्या जातात आणि त्यांचे कार्य सभापतींच्या निर्देशानुसार केले जाते.
नव्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपूर्वी आधीच्या लोकसभेचे अध्यक्षपद रिक्त केले जाते. त्यानंतर स्पीकरच्या जबाबदाऱ्या स्पीकर प्रो टेम पार पाडतात जे निवडून आलेल्या खासदारांमध्ये वरिष्ठ मानले जातात. तात्पुरते पद सांभाळण्यासाठी प्रोटेम स्पीकर संसदेतील कामकाज चालवण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी नियुक्त केले जाते. Lok Sabha Speaker Election 2024 |
अध्यक्ष पदाच्या शर्यतीत ही नावे चर्चेत
तर दुसरीकडे, चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीशकुमार यांच्या जेडीयू कडूनही अध्यक्षपदाची मागणी केली गेली आहे. लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय भृतहरि महताब आणि डी पुरंदेश्वरी यांच्या नावांचीही चर्चा आहे.
हेही वाचा: