Delhi AIIMS Hospital | दिल्लीत 28 जून रोजी शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. इतकेच काय तर एम्सच्या ऑपरेशन थिएटरवरही या पावसाचा परिणाम झाला. पावसामुळे दिल्ली एम्सची एक-दोन नव्हे तर नऊ ऑपरेशन थिएटर्स बंद आहेत. हॉस्पिटलच्या स्टोअर रूममध्येही पावसाच्या पाण्याने पाणी भरले होते. ऑपरेशन थिएटर्स बंद असल्याने शस्त्रक्रियांवर परिणाम झाला. ज्यामुळे रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागला.
एम्सच्या ट्रॉमा सेंटरच्या तळमजल्यावर पाणी साचल्याने ऑपरेशन थिएटर बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे. पावसामुळे तळमजल्यावर पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पाणी साचल्याने संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा बंद झाला. वीजपुरवठ्याअभावी ऑपरेशन थिएटर्स बंद आहे. Delhi AIIMS Hospital |
याबाबत एम्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या रुग्णांना आपत्कालीन शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना सफदरजंग आणि राजधानीतील इतर सरकारी रुग्णालयात पाठवावे. आजही ऑपरेशन थिएटरवर परिणाम होण्याची भीती आहे. मात्र देशातील अव्वल रुग्णालयांमध्ये समावेश असलेल्या दिल्ली एम्सची ही अवस्था असल्याचे समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
शहराचे प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेने शुक्रवारी सकाळी 8.30 पूर्वीच्या 24 तासांत 228.1 मिमी पावसाची नोंद केली, जी जूनच्या सरासरी 74.1 मिमी पावसाच्या तिप्पट आहे. 1936 नंतर 88 वर्षात या महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, एका दिवसात 124.5 ते 244.4 मिमी दरम्यान पडणारा पाऊस हा अतिवृष्टी मानला जातो. Delhi AIIMS Hospital |
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1चे छत कोसळले
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. तर हादरा येथील न्यू उस्मानपूर परिसरात पावसाच्या पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले. तसेच अनेक भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.
शशी थरूर यांच्या घरात पावसाचे पाणी
दिल्लीतील या पावसाचा फटका काँग्रेस नेते शशी थरूर यांना देखील बसला आहे. या पावसामुळे काल सकाळी त्यांच्या दिल्लीतील ‘ल्युटन्स’ घरातही पाणी साचले होते. शशी थरूर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. तसेच यामुळे त्यांच्या घरातील काही वस्तूंचे नुकसानही झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: