पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स संघाने रेव्हन्स संघाचा 4-1 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत अंतिम फेरीत हॉक्स संघाने रेव्हन्स संघाचा 4-1 असा पराभव केला. गोल्ड खुल्या दुहेरी 1 गटात हॉक्सच्या राधिका इंगळहळीकर व नीलेश केळकर यांना रेव्हन्सच्या तेजस चितळे व बिपिन चोभे यांनी 12-21, 14-21 असे पराभूत केले.
त्यानंतर गोल्ड खुल्या दुहेरी 2 गटात हॉक्सच्या तन्मय आगाशेने मिहिर विंझेच्या साथीत केदार नाडगोंडे व हर्षद जोगाईकर यांचा 21-08, 21-18 असा तर, खुल्या दुहेरी 3 गटात हॉक्सच्या निखिल चितळे व गिरीश खिंवसरा यांनी रेव्हन्सच्या विनित रुकारी व अमोल मेहेंदळे यांचा 21-13, 21-19 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या दुहेरी 4 गटात आनंद शहा व आदित्य जितकर यांनी अविनाश दोशी व कुणाल शहा यांचा 21-17, 18-1, 15-13 असा तर, मिश्र दुहेरी 5गटात हॉक्सच्या गौरी कुलकर्णी व अक्षय ओक यांनी प्रांजली नाडगोंडे व तन्मय चितळे यांचा 21-14, 21-19 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागु, ट्रूस्पेसचे संचालक अश्विन त्रिमल, उल्हास त्रिमल आणि बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, केदार नाडगोंडे, समीर जालन, दिप्ती सरदेसाई आणि रणजीत पांडे आदी उपस्थित होते.