वडापुरी, (वार्ताहर) – विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असून, या जागांसाठी अनेक जण इच्छूक असले तरी, भाजपकडून विधानसभेच्या दृष्टीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील यांचे नाव भाजपच्या केंद्रीय कोअर कमिटीकडे दिले असल्याची माहिती आहे.
हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेत संधी दिल्यास इंदापूर विधानसभा मतदार संघाबाबतचा महायुतीचा पेच मिटण्याची शक्यता आहे. भाजप सोमवारपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे.