Gopikishan Bajoria | लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय नेते वेगवेगळ्या भूमिका घेत असल्यचार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार शरद पवारांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यातच शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया आणि माजी आमदार विप्लव बजोरिया यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. यावरच आता बाजोरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी उध्दव ठाकरे यांना भेटल्याचे वृत्त खोडसाळ असल्याचं म्हणत शिवसेना माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे.
विधान परिषदेतून निवृत्त झालेले शिवसेनेचे आमदार विप्लव बजोरिया आणि माजी आमदार गोपिकिशन बजोरिया यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त काही माध्यमांमधून प्रसारित करण्यात आले . मात्र हे वृत्त साफ खोटे असून खोडसाळपणाचे असल्याचे गोपीकिशन बजोरिया यांनी म्हटले आहे.
त्यांना मी नमस्कार सुद्धा केले नाही भेटण्याची गोष्ट दूरची Gopikishan Bajoria |
विधान भवनातील लॉबी मध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जात असताना समोरून उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे येताना दिसले. त्यांना मी नमस्कार सुद्धा केले नाही भेटण्याची गोष्ट दूरची आहे असे गोपीकिशन बजोरिया यांनी सांगितले. उबाठा गटाची विश्वासाहर्ता संपली आहे. खोट्या बातम्या देऊन खोटी प्रसिध्दी करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून पुढे येऊन सांगावे की मी त्यांना भेटलो होतो. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सत्य बाजू मांडणार असल्याचे गोपीकिशन बजोरिया यांनी सांगितले.
गोपीकिशन बजोरिया यांची आज पत्रकार परिषद Gopikishan Bajoria |
शिवसेना नेते गोपीकिशन बजोरिया यांनी ते आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेत बंड केलं होतं. त्यावेळी विधानपरिषदेतून त्यांना सर्वप्रथम विप्लव बजोरिया यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे, डॉ. मनीषा कायंदे, आमशा पाडवी या आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला.
हेही वाचा
राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? ; प्रफुल पटेल म्हणाले,”अजित पवार यांनी..”