Entertainment । प्रिन्स नरुलाने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एका सुंदर पोस्टद्वारे घोषणा केली आहे की तो लवकरच वडील होणार आहे. लग्नाच्या 6 वर्षानंतर युविका चौधरी आणि प्रिन्स आई-वडील होणार आहेत. नुकतेच मुलाच्या प्लॅनिंगबद्दल बोलताना युविका चौधरी म्हणाली होती की, ‘तिने आणि प्रिन्सने मिळून ठरवले आहे की, जोपर्यंत त्यांचे मुंबईत स्वतःचे घर होत नाही तोपर्यंत ते मुलासाठी प्लॅन करायचे नाहीत. ते दोघेही वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते आणि आता त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.’
View this post on Instagram
त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर, प्रिन्सने त्याच रंगाच्या खेळण्यांच्या जीपसह त्याच्या लाल जीपचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘सर्वांना माझा नमस्कार, या भावना तुमच्यासोबत कशा शेअर कराव्यात हे मला कळत नाही, कारण आज आम्ही खूप आनंदी आहोत. आनंदी आणि थोडे चिंताग्रस्त देखील. या खास प्रसंगी मला देवाचे आभार मानायचे आहेत. लवकरच आमचे बाळ या जगात येणार आहे. इथून आमच्या दोघांचे आयुष्य त्याच्याभोवती फिरणार आहे.’ असं म्हणत त्याने आपले प्रेम व्यक्त केले आहे.
प्रिन्सच्या या पोस्टखाली इंडस्ट्रीतील त्याच्या सर्व मित्रांनी कमेंट करून या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. रती सिंहच्या लग्नादरम्यान युविकाच्या प्रेग्नेंसीची बातमी मीडियात लीक झाली होती. पण अतिशय हुशारीने या जोडप्याने ही बातमी अफवा ठरवून प्रकरण टाळले. युविका आणि प्रिन्स बिग बॉसच्या घरात भेटले होते. शोदरम्यानच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.