कार्ला, (वार्ताहर) – लोणावळा व परिसरातील गावातील नागरिकांना घरगुती स्वयंपकाचा गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गॅस वितरण विभागाकडून लोणावळा व परिसरातील गावात काही दिवस ठरवून गॅस सिलिंडरचे वाटप होत असते. परंतु, काही दिवसांपासून यात खंड पडला असून सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच गॅस वितरकांकडून वेळवर गॅस सिलिंडरचे वाटप होत नाही. चौकशीसाठी गेल्यावर उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप त्रस्त नागरिक करत आहेत.
कित्येक तास सिलिंडरसाठी वाट पहावी लागत आहे. तसेच अनेकदा चकरा मारूनही सिलिंडर मिळत नसल्याने वेळ आणि पैसेही वाया जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वितरकांकडून विळेवर सिलिंडर मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.