Salman Khan Firing Case| बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सातत्याने नवेनवे खुलासे होत आहे. याप्रकरणी आता आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. पनवेलमध्ये अभिनेता सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे आता या प्रकरणाचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे.
चार जणांना अटक
सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधील शस्त्र पुरवठा करणाऱ्याकडून शस्त्रे मागवण्याचा प्रयत्न होता. यात अटक करण्यात आलेल्या धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना आणि झिशान खान उर्फ जावेद खान अशी आरोपींची नावे आहेत. Salman Khan Firing Case|
काय होता प्लान ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या कारवर पनवेलमध्ये हल्ला करण्याची योजना लॉरेन्स बिश्नोई गँगने आखली होती. बिश्नोईचा मोठा भाऊ अनमोल आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार या दोघांनी पाकिस्तानच्या एका बेकायदा शस्त्र विक्रेत्याकडून AK-47, M-16 आणि AK-92 अशा अत्याधुनिक बंदुका खरेदी करणार होते. त्यानंतर त्या महाराष्ट्रात पाठवून त्याच्या कारवर हल्ला करुन त्याला ठार करण्याची योजना आखण्यात आली होती. सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर जो हल्ला झाला, त्याच्या एक महिना आधी बिश्नोई गँगने हा कट रचला होता.
Navi Mumbai Police has arrested four people from Lawrence Bishnoi’s gang as they had planned to attack actor Salman Khan’s car in Panvel. For this, there was a plan to order weapons from a Pakistani arms supplier. FIR has been registered against more than 17 people including…
— ANI (@ANI) June 1, 2024
नेमकं काय घडलं होतं? Salman Khan Firing Case|
14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगवान तपास करत आरोपींना अटक केली. या घटनेनंतर पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमध्ये पकडले होते.
हेही वाचा:
टीएमसी समर्थकांवर जाधवपूरमध्ये बॉम्बस्फोटाचा आरोप, सुरक्षा दलांनी केला ‘लाठीचार्ज’