पुणे : फरासखाना पोलिसांना 20 बॅरेकेटस मिळाले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस दलासाठी कायदा व सुव्यवस्थेसाठी आवश्यक बाबीसाठी लागणाऱ्या साहित्याची मदत घेण्याच्या सुचना केली होती. त्यानुसार फरासखाना पोलिसांनी स्वयंसेवी संघटना आणि दानशुर व्यक्तींना आवाहन केले होते.
त्यानुसार जे.के.सिमेंट कंपनी, कोरेगाव पार्क शाखा यांच्या वतीने जाहिरात खर्चातून आगामी श्री संत तुकराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उत्सव सोहळा आणि गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागात होणारी गर्दी, वाहतुक नियमाकरिता २० बॅरिकेट देण्याची तयारी दर्शविली.
हे बॅरिकेट देण्यात आले.त्यावेळी जे.के.सिमेंट कंपनीचे केदार शहागडकर, राजेश देशपांडे, मुकुंद देशपांडे, अभय पुजारी, जयसिंग कदम, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सदीपसिंग गील, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे, फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, गोपनीय पथकाचे अंमलदार जगताप, पोलीस शिपाई औटी उपस्थित होते.