वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदार संघातून सलग तिसऱ्यांना विजयी झाले आहेत. मात्र त्यांचे २०१९ च्या तुलनेत आता २०२४ मध्ये मताधिक्य कमी झाले आहे.
मतमोजणीच्या काही फेऱ्यांमध्ये तर मोदी चक्क मागेही पडल्याचे आढळून आले होते. त्याहुन विशेष बाब ही वाराणसी मतदार संघातही काही मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला.
निवडणुकीत रिंगणात असलेले कोणीच उमेदवार जर मतदारांना पसंत नसतील तर त्यांनी नोटाचे बटन दाबायचे असते. हा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तथापि, सलग दोन टर्म पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी यांच्याच मतदारसंघात नोटाचा वापर होणे आश्चर्यकारक मानले जाते आहे.
मोदींना ६१२९७० मते मिळाली तर कॉंग्रेसचे उमेदवार अजय राय यांना ४६०४५७ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असणारे बहुजन समाज पक्षाचे उमेदवा अतहर जमाल लारी यांना ३३७६६ मते मिळाली.
अन्य उमेदवारांना दोन हजार ते पाच हजार या टप्प्यात मते मिळाली. मात्र त्यापेक्षा नोटाचा पर्याय स्विकारणाऱ्या मतदारांची संख्या अधिक म्हणजे ८४७८ एवढी होती.