Mark Rutte | NATO Chief – नेदरलॅन्डचे मावळते पंतप्रधान मार्क रुट यांची नाटो अर्थत नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशनच्या भावी सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यत आली आहे. युक्रेनच्या युद्धाची व्याप्ती वाढत असल्यामुळे धोका निर्माण झालेल्या युरोपच्या संरक्षणाची जबाबदारी आता नाटोवर अर्थात पर्यायाने मार्क रुट यांच्यावरच असणार आहे.
ब्रुसेल्समध्ये नाटोच्या मुख्यालयात सर्व ३२ सदस्य देशांच्या नाटो राजदूतांच्या उपस्थितीत नवीन सरचिटणीसांच्या निवडीची प्रक्रीया आज पार पडली. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांचे समकक्ष नेते ९ ते ११ जुलैला वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या परिषदेत रुट यांचे औपचारिक स्वागत करतील.
नाटोचे विद्यमान सरचिटणीस नॉर्वेचे जेन्स स्टॉटेन्बर्ग यांच्या जागेवर १ ऑक्टोबरपासून मार्क रुट नटोचे सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. स्टॉटेन्बर्ग यांनी जवळपास दशकभर नाटोचे सरचिटणीस म्हणून काम बघितले आहे.
त्यांना सातत्याने मुदतवाढ देण्यत आली होती. विशेषतः रशियाने २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला केल्यापासून त्यांच्यावरची जबाबदारी खूपच वाढली होती.